Emcure pharmaceuticals
एमक्योर फार्मास्युटिकल्स
एमक्योर फार्मास्युटिकल्स ही पुण्यातील एक नामांकित औषध
निर्माण कंपनी आहे. या कंपनीची स्थापना १९८१ मध्ये झाली. ही कंपनी जगातील ७० पेक्ष्या जास्त देशात काम
करते. हि कंपनी देशातील १३ वी सर्वात मोठी फार्मा कंपनी आहे. या कंपनीचे एमडी व
सिइओ श्री सतीश मेहता हे आहेत. हि कंपनी व्हिटॅमिन, मिनरल्स आणि नुट्रीएंट्स, डायबेटिस, हृदयरोग, स्त्रीरोग, कॅन्सर, एच आई व्ही या व
अश्या अनेक प्रकारच्या रोगावरील औषधे बनवते.
सध्या एमक्योर फार्मास्युटिकल्स च्या शेअरची खूप चर्चा होत आहे. एमक्योर फार्मास्युटिकल्सने आपल्या IPO ची घोषणा केली. शेअरची किंमत प्रति शेअर ९६०रु. ते १००८ रु ठरवली होती. हा IPO ३ जुलै २०२४ ला सुरु झाला होता, ५ जुलै २०२४ ला बंद झाला. या शेअर ची १० जुलै २०२४ ला लिस्टिंग झाली आहे.
नमिता थापर ज्यांना आपण नेहेमी शार्क टॅंक या शो मध्ये
पाहतो, त्या एमक्योर
फार्मास्युटिकल्सच्या कार्यकारी संचालक आहेत.
Comments
Post a Comment