जाणून घ्या, वाघनखे कशी प्रसिद्ध झाली !! SHIVAJI MAHARAJ AND TIGER CLAW


जाणून घ्या, वाघनखे कशी प्रसिद्ध झाली !! SHIVAJI MAHARAJ AND TIGER CLAW


 छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त महाराष्ट्रातच नाहीतर संपूर्ण जगात एक महान आणि कौशल्यपूर्ण योद्धया म्हणून ओळखले जाते. त्यामुळे आपली मान अभिमानाने उंच होते.  छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० मध्ये झाला. शिवाजी महाराज त्यांच्या शौर्य आणि युद्धकौशल्यासाठी  प्रसिद्ध आहेत.  


वाघनखे हे छत्रपती शिवाजी महाराज  यांच्या  युद्धशस्त्रांपैकी एक महत्वाचे शस्त्र होते. शिवाजी महाराजांनी वाघनखे वापरून अनेक युद्धांमध्ये विजय मिळवला.


विशेषतः, अफजलखानाचा वध करण्याच्या प्रसंगात वाघनखे अतिशय प्रसिद्ध झाले. १६५९ साली शिवाजी महाराज आणि अफजलखान यांच्या भेटीचा प्रसंग घडला. अफजलखान हा आदिलशाही साम्राज्याचा सेनानी होता, आणि त्याने या आधी ही  सरदारांना दगाफटका केल्याचे शिवाजी महाराजांना  माहिती होते. त्यामुळे त्यांनी अफजलखान च्या भेटी दरम्यान सावधगिरी म्हणून चिलखत घातले. तसेच सोबत बिचवा व वाघनखे ठेवली. ठरल्या प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज अफजलखानाच्या भेटीला गेले. 




आणि शिवाजी महाराज यांची शंका खरी ठरली,अफजल  खानाने फसवण्याचा प्रयत्न केला. भेटीच्या वेळी अफजलखानाने शिवाजी महाराजांना मिठी मारून दगाफटका करण्याचा प्रयत्न केला. परंतु, शिवाजी महाराजांनी त्यांच्या जवळ वाघनखे लपवली होती. त्यांनी ती वापरून अफजलखानाचा वध केला. आणि यामुळेच वाघनखे खूप महत्वाचे शस्त्र बनले. 


वाघनख्यांच्या सहाय्याने शिवाजी महाराजांनी केलेला हा वीरप्रसंग मराठी इतिहासात एक महान उदाहरण म्हणून मानला जातो. यामुळे वाघनखे हे शस्त्र मराठा योद्ध्यांच्या युद्धकौशल्याचे प्रतीक बनले आहे.



 अशीच नव नवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला नक्की भेट द्या . 

  





Comments

Popular posts from this blog

जेसिका वॉटसन : एक साहस कथा JESSICA WATSON : AN ADVENTURE STORY

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, महाराष्ट्र राज्य Mukhyamantri Laadki bahin Yojna in Marathi

Emcure pharmaceuticals