लिओनेल मेस्सी ; एका महान फ़ुटबॉलपटू Lionel Messi

लिओनेल मेस्सी ; एका महान फ़ुटबॉलपटू Lionel Messi लिओनेल मेस्सी ; एका महान फ़ुटबॉलपटू Lionel Messi फुटबॉल विश्वातील एक सन्माननीय नाव म्हणजे लिओनेल मेस्सी. हे नाव घेताच अनेकांच्या मनात उत्सुकता निर्माण होते. अर्जेंटिनाच्या या महान फुटबॉलपटूने आपल्यातील अद्वितीय कौशल्यआणि मेहनतीने जागतिक फुटबॉलला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. लिओनेल अँड्रेस मेस्सीचा जन्म २४ जून १९८७ रोजी अर्जेंटिनाच्या रोझारियो या शहरात झाला. लहानपणीच त्याच्यातील फुटबॉलची आवड दिसून आली. पण वयाच्या १० व्या वर्षी त्याला ग्रोथ हार्मोन डेफिशियंसी या नावाचा रोग झाला. वयाच्या १३ व्या वर्षी, मेस्सी आपल्या कुटुंबासह स्पेनला गेला, आणि त्यानंतर त्याने बार्सिलोना येथील फुटबॉल क्लबमध्ये प्रवेश घेतला. बार्सिलोना क्लबमध्ये मेस्सीने त्याच्या खेळाचे सर्वोकृष्ट असे प्रदर्शन केले. मेस्सीने क्लबसाठी २००४ साली पहिल्यांदा खेळायला सुरुवात केली . त्यानंतरचा त्याचा प्रवास अत्यंत महत्वाचा व यशस्वी ठरला. बार्सिलोना क्लबसाठी खेळताना मेस्सीने अनेक विक्र...