जेसिका वॉटसन : एक साहस कथा JESSICA WATSON : AN ADVENTURE STORY
जेसिका वॉटसन : एक साहस कथा
![]() |
जेसिका वॉटसन : एक साहस कथा JESSICA WATSON : AN ADVENTURE STORY (फोटो सौ.- जेसिका वॉटसन अधिकृत संकेतस्थळ) |
समुद्राची राणी
म्हणजे जेसिका वॉटसन असे बोलले तर अतिशयोक्ती नाही ठरणार, कारण तिची साहस कथाच तितकी मोठी आहे. जेसिका वॉटसन ही
ऑस्ट्रेलियन तरुणी केवळ १६ वर्षांची असताना समुद्रात एकटीने आणि न थांबता जगभर
प्रवास करणारी सर्वात लहान व्यक्ती ठरली. तिच्या धैर्याने आणि आत्मविश्वासाने तिने
संपूर्ण जगाला प्रभावित केले.
जेसिका वॉटसनचा
जन्म १८ मे १९९३ रोजी ऑस्ट्रेलिया मधील क्वीन्सलँड येथे झाला. जेसिकाच्या मनात
लहानपणापासूनच समुद्राबद्दल खूप जास्त आकर्षण होते. त्यामुळे तिने लहान असल्यापासूनच नौकानयनाचे
धडे घेण्यास सुरवात केली. तिने समुद्रमार्गे जगभ्रमंती करण्याचे ठरविल्यानंतर नौकानयनाशी
निगडित विविध प्रकारचे प्रशिक्षण घेण्यास सुरवात केली. लहानपणापासून ती
डिस्लेक्सिया या आजाराशी लढा देत होती. पण या आजाराला तिने कधी स्वतःच्या
ध्येयाच्या आड येऊ दिले नाही. तिने जे ध्येय ठरविले होते ते खूप धोकादायक आहे
याचीही तिला कल्पना होती, पण त्याला तिने
धाडसाने सामोरे जायचे ठरविले.
जेसिकाने तिच्या एल्सा
पिंक लेडी या नौकेतून हे धाडस
करण्याचे ठरवले. ती नौका लहान होती पण तिचा आत्मविश्वास अफाट होता. तिच्या कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे ती कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यास सज्ज
झाली.
१८ ऑक्टोबर २००९
मध्ये, जेसिकाने आपल्या प्रवासाची
सुरवात सिडनी हार्बर येथून केली. तिने संपूर्ण प्रवास एकटीने
व ना थांबता करण्याचे
ठरविले, इतकेच नाहीतर या प्रवासात
बाहेरील कोणतीही किंवा कुणाचीही मदत न घेता समुद्रामार्गे जगभ्रमंती करायची होती. तिने हा प्रवास २१० दिवसांमध्ये २३०००
नॉटिकल मैल इतका केला. तिने हा प्रवास पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर आणि हिंद महासागरातून अश्या मार्गे पूर्ण केला.
प्रवासादरम्यान,
जेसिकाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
समुद्राच्या भयाण तुफानी लाटा, खराब हवामान,
नौकेतील तांत्रिक अडचणी, एकटेपण अश्या अनेक समस्यांचा तिने सामना केला. पण तिच्या
आत्मविश्वास आणि जिद्दीने या सगळ्या अडचणींवर मात केली.
१५ मे २०१० रोजी, जेसिका समुद्रामार्गे जगभ्रमंती सिडनीमध्ये परत
आली. तिच्या आगमनावेळेस हजारो लोकांनी तिचे स्वागत केले. तिच्या या यशाने संपूर्ण
जगात तिच्या या पराक्रमाची चर्चा झाली. तिच्या या धैर्य आणि साहसाने जगातील अनेक
तरुणांचा ती प्रेरणा स्तोत्र बनली.
जेसिकाच्या या
साहसाचा सन्मान अनेक पुरस्कारांनी करण्यात आला. तिला 'ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया' या ऑस्ट्रलियातील अत्यंत सन्माननीय पुरस्काराने गौरविण्यात
आले. तिच्यावर या साहसाच्या कथा सांगणारी अनेक पुस्तके, डॉक्युमेंट्री आणि चित्रपट प्रदर्शित झाले.
जेसिका वॉटसनच्या
जीवनातून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. आत्मविश्वास, धैर्य, निर्धार, सातत्य आणि स्वप्नांचा पाठपुरावा कसा करावा हे
तिच्या प्रवासातून स्पष्ट होते. ती आजही तरुणांच्या प्रेरणेचा स्रोत आहे आणि
तिच्या साहसाच्या कथांची आजही जगभरात चर्चा होताना दिसते.
जेसिका वॉटसनची ही
कहाणी धैर्य आणि साहसाची प्रेरणा देणारी आहे. हा लेख आवडला असेल कंमेंट करून नक्की
कळवा आणि जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा.
Comments
Post a Comment