जॉर्ज फोरमन : बिग जॉर्ज बॉक्सिंग रिंगमधील महानायक George Foreman : Big George

 

जॉर्ज फोरमन : बिग जॉर्ज बॉक्सिंग रिंगमधील महानायक 
George Foreman : Big George



जॉर्ज फोरमन : बिग जॉर्ज बॉक्सिंग रिंगमधील महानायक  George Foreman : Big George

जॉर्ज फोरमन : बिग जॉर्ज बॉक्सिंग रिंगमधील महानायक 

George Foreman : Big George


जॉर्ज फोरमन हे बॉक्सिंग रिंगमधील प्रचंड गाजलेले नाव!! त्यांचा जन्म १० जानेवारी १९४९ रोजी अमेरिकेतील टेक्सस राज्यातील मार्शल या शहरात झाला. त्यांचा आयुष्याचा प्रवास अत्यंत खडतर होता, त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यांचा जीवनप्रवास हा फक्त एक महान बॉक्सिंग चॅम्पियन म्हणून नाही तर एक यशस्वी उद्योजक, त्याचबरोबर एका प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणूनही ओळखला जातो.

फोरमन यांचे बालपण अत्यंत गरिबीत गेले. तरुण वयात त्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. एका जाहिरातीमुळे त्यांचे आयुष्य बदलले आणि तिथेच त्यांची पाऊले बॉक्सिंग कडे वळली. त्यांच्या मधील प्रचंड शारीरिक शक्ती आणि आत्मविश्वास यामुळेच ते बॉक्सिंगमधील महान खेळाडू म्हणून जगभर प्रसिद्ध आहेत. १९६८ मध्ये मेक्सिको मध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये फोरमन यांनी सुवर्णपदक जिंकून आपल्या कारकिर्दीस सुरवात केली. त्यानंतर त्यांनी व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये पाऊल ठेवले आणि १९७३ मध्ये जो फ्रेझियरला यांना पराभूत करून पहिल्यांदा हेवीवेट चॅम्पियनशिप जिंकली.

फोरमन यांनी १९७७ मध्ये बॉक्सिंगमधून निवृत्ती घेतली आणि त्यानंतर त्यांच्या जीवनाच्या एका नव्या पर्वाला सुरवात झाली. त्यांनी अध्यात्मिक आणि धार्मिक कार्यामध्ये स्वतःला संपूर्णपणे झोकून दिले. पण वयाच्या ४० व्या वर्षी त्यांनी व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये परत येण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्याला पुन्हा एकदा मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले.

१९९४ मध्ये, वयाच्या ४५ व्या वर्षी मायकेल मूररला यांना पराभूत करून ते जगातील व इतिहासातील सर्वात वृद्ध हेवीवेट बॉक्सिंग चॅम्पियन बनले. त्यांच्या या विजयानंतर त्यांना 'बिग जॉर्ज' म्हणून ओळखले जाऊ लागले. यावरून असे म्हणता येईल कि वेळ निघून गेलेली नाही आपण वयाच्या कोणत्याही वर्षी स्वतःला यशस्वी करू शकतो. फक्त गरज आहे ती प्रचंड आत्मविश्वास आणि मेहनत यांची !!

फोरमन यांची कारकीर्द फक्त बॉक्सिंगपुरती मर्यादित राहिली नाही. त्यांनी उद्योगामध्येही उद्योजकतेमध्येही आपले नशीब कमावले आणि 'जॉर्ज फोरमन ग्रिल' या उत्पादनाच्या माध्यमातून एक नवा यशस्वी अध्याय लिहिला. ही ग्रिल जगभरात प्रचंड लोकप्रिय ठरली आणि १०० मिलियन युनिट्सची विक्री झाली.

जॉर्ज फोरमन हे केवळ एक महान खेळाडू नाहीत, तर एक प्रेरणादायी वक्ते आणि सामाजिक कार्यकर्ते देखील आहेत. त्यांच्या जीवनातील अनेक संघर्ष आणि यशस्वी पुनरागमनामुळे ते अनेकांसाठी ऊर्जेचा प्रेरणास्त्रोत ठरले आहेत. फोरमन यांनी त्यांच्या अनुभवांमधून शिकलेल्या गोष्टींना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध प्रेरणादायी भाषणाद्वारे लोकांना प्रोत्साहित करत राहिले.

जॉर्ज फोरमन यांचा जीवनप्रवास हा एक धैर्य, संकल्प आणि पुनरागमनाची प्रेरणादायी जीवनप्रवास आहे. त्यांच्या जीवनातील विविध पैलूंनी त्यांना एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व बनवले आहे. त्यांनी बॉक्सिंगच्या रिंगमधून ते व्यवसायातील यशापर्यंत प्रत्येक क्षेत्रात आपली छाप सोडली. फोरमन यांची प्रेरणादायी कहाणी आपल्याला शिकवते की, जीवनातील कोणत्याही क्षणी आपण आपला मार्ग बदलू शकतो आणि नव्या यशस्वीतेची वाटचाल करू शकतो.

मला वाटते आपल्यातील प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या संघर्षाला तोंड देत आपला जीवन प्रवास करत आहोत. अश्या वेळेस जॉर्ज फोरमन सारखी माणसे आपल्याला एक संजीवनी देऊन जातात.

त्यांच्या जीवनपटाची माहिती देणारा चित्रपट नेटफ्लिक्सवर (NETFLIX) उपलब्ध आहे, तो पाहण्यासाठी नेटफ्लिक्सला नक्की भेट द्या. https://www.netflix.com/

 

 

Comments

Popular posts from this blog

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, महाराष्ट्र राज्य Mukhyamantri Laadki bahin Yojna in Marathi

जेसिका वॉटसन : एक साहस कथा JESSICA WATSON : AN ADVENTURE STORY

नारी शक्ती दूत अँप, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना Mukhyamantri mazi ladki bahin yojna in Marathi