लिओनेल मेस्सी ; एका महान फ़ुटबॉलपटू Lionel Messi

 लिओनेल मेस्सी ; एका महान फ़ुटबॉलपटू    

Lionel Messi 




लिओनेल मेस्सी ; एका महान फ़ुटबॉलपटू     Lionel Messi

लिओनेल मेस्सी ; एका महान फ़ुटबॉलपटू    

Lionel Messi 


फुटबॉल विश्वातील एक सन्माननीय नाव म्हणजे लिओनेल मेस्सी.  हे नाव घेताच अनेकांच्या मनात उत्सुकता निर्माण होते. अर्जेंटिनाच्या या महान फुटबॉलपटूने आपल्यातील अद्वितीय कौशल्यआणि मेहनतीने जागतिक फुटबॉलला एका नव्या  उंचीवर नेऊन ठेवले आहे. 

लिओनेल अँड्रेस मेस्सीचा जन्म २४ जून १९८७ रोजी अर्जेंटिनाच्या रोझारियो या शहरात झाला. लहानपणीच त्याच्यातील फुटबॉलची आवड दिसून आली. पण वयाच्या १० व्या वर्षी त्याला ग्रोथ हार्मोन डेफिशियंसी या नावाचा रोग झाला. वयाच्या  १३ व्या वर्षी, मेस्सी आपल्या कुटुंबासह स्पेनला गेला, आणि त्यानंतर त्याने बार्सिलोना येथील फुटबॉल क्लबमध्ये प्रवेश घेतला. 

बार्सिलोना क्लबमध्ये मेस्सीने त्याच्या खेळाचे सर्वोकृष्ट असे प्रदर्शन केले. मेस्सीने क्लबसाठी २००४ साली पहिल्यांदा खेळायला सुरुवात केली . त्यानंतरचा त्याचा प्रवास  अत्यंत महत्वाचा व  यशस्वी ठरला. बार्सिलोना क्लबसाठी खेळताना मेस्सीने अनेक विक्रम स्वतःच्या नावावर प्रस्थापित केले. त्याने अनेक ट्रॉफी जिंकल्या आणि स्वत:ला जगातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू म्हणून जगात आपले नाव सिद्ध केले.

अर्जेंटिनाच्या राष्ट्रीय संघासाठी मेस्सीने अनेक महत्वपूर्ण सामने खेळले आहेत. २०२१ साली, मेस्सीने कोपा अमेरिका जिंकून अर्जेंटिनाला मोठी कामगिरी दिली. हा विजय मेस्सीच्या करिअरमधील महत्वाची कामगिरी होती. मेस्सीला त्याच्यामधील उत्कृष्ट  कौशल्यामुळे अनेक व्यक्तिगत पुरस्कार मिळाले आहेत. त्याला सात वेळा बालोन डी'ऑर हा एक पुरस्कार मिळाला आहे, जो जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंना दिला जातो. 

२०२१ साली  मेस्सीने बार्सिलोना क्लब  सोडला व त्यानंतर त्याने फ्रान्सच्या पॅरिस सेंट-जर्मेन क्लबमध्ये प्रवेश घेतला. तिथेही त्याने आपल्या  मेहनत  आणि कौशल्याच्या जोरावर क्लबला अनेक महत्वपूर्ण विजय मिळवून दिले. 

लिओनेल मेस्सी हा फक्त एक फुटबॉलपटूच  नाही, तर एक महान आणि  प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. त्याच्या मेहनत, समर्पण आणि कौशल्यामुळे तो फुटबॉल जगतात एक आदर्श ठरला आहे. फुटबॉलप्रेमींना मेस्सीच्या अद्वितीय खेळातून स्फूर्ती मिळते आणि त्याचा प्रवास अजूनही प्रेरणादायी राहील. 

मेस्सीला पाहिल्यानंतर समजून येते की,  कठोर परिश्रम, समर्पण आणि आत्मविश्वासाच्या जोरावर आपण कोणतेही स्वप्न सत्यात उतरवू शकतो.

कसा वाटला  मेस्सीचा प्रेरणादायी प्रवास !! कंमेंट करून नक्की कळवा. 

Comments

Popular posts from this blog

जेसिका वॉटसन : एक साहस कथा JESSICA WATSON : AN ADVENTURE STORY

Emcure pharmaceuticals

जॉर्ज फोरमन : बिग जॉर्ज बॉक्सिंग रिंगमधील महानायक George Foreman : Big George