लाँच झाली ! जगातील पहिली CNG बाईक जाणून घ्या अधिक !! BAJAJ FREEDOM CNG BIKE



लाँच झाली ! जगातील पहिली
CNG बाईक 

जाणून घ्या अधिक !! BAJAJ FREEDOM CNG BIKE

BAJAJ FREEDOM CNG BIKE

नुकतेच पुण्यामध्ये बजाज ऑटो  कंपनी ने जगातील पहिली CNG बाईक लाँच केली. या लाँचिंग प्रोग्रॅमला केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री मा.श्री नितीन गडकरी साहेब उपस्थित होते. चला तर मग या बाईक बद्दल जाणून घेऊया !!

या बाईकचे वापरकर्ते त्याचा ऑपरेटिंग खर्च ५०% पर्यंत कमी करू शकतात, यामुळे खर्चात लक्षणीय बचत होण्यास मदत होईल. या बाईकचे सर्वात लांब-इन-क्लास सीट आणि मोनो-लिंक्ड प्रकारचे सस्पेंशन उत्कृष्ट आराम देते, त्याचबरोबर ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी सुविधा आणखी वाढवते. या मोटरसायकलमध्ये 2-लिटरची सहायक पेट्रोल टाकी देखील आहे ज्यामुळे तुम्ही सहज स्विच करू शकता. या बाईक ची एक्स शोरूम किंमत हि १,१०,००० रुपये आहे.

 

  • पहिल्यांदया आपण या बाईक ची विशेष आकर्षणे जाणून घेऊया,

     १. १६ इंच रिअर व्हील

     २. रुंद हॅन्डल बार

     ३. मुख्य सीट ते टॅंक यातील समतोल

 

  • या बाईक मध्ये उपलब्ध करून दिलेल्या विशेष सुविधा बद्दल बोलायचे झाल्यास,

     १. मोटरसायकलमध्ये 2-लिटरची सहायक पेट्रोल टाकी

     २. ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह पूर्णपणे डिजिटल स्पीडोमीटर

     ३. एलईडी हेडलॅम्प

 

  • या बाईकच्या परफॉर्मन्स बद्दल बोलायचे झाल्यास,

इंजिन क्षमता १२५ सीसी असून इंजिन बाईक ला ९.५ PS चे पॉवर आणि ९.७ NM इतके टॉर्क निर्माण  करते. (इंजिन प्रतिमा ९.५ Ps @ ८००० कमाल पॉवर (सीएनजी), ९.७ NM @ ५००० टॉर्क (सीएनजी)

या बाईकला २ लिटर चे पेट्रोल फ्युएल टॅंक आणि २ किलोग्रॅम चे CNG टॅंक देण्यात आली आहे.


  • या बाईकच्या सुरक्षितता बद्दल बोलायचे झाल्यास,

          १. टॅंक शिएल्ड सह प्रोटेक्टिव्ह ट्रेलीस फ्रेम पुरविण्यात आलेले आहे

         २. पेसो सर्टिफाइड CNG सिलेंडर ची सुविधा पुरविण्यात आलेली आहे.

         ३. धूळ आणि चिखलापासून संरक्षण करण्यासाठी, फोर्क स्लीव्हज संरक्षक देण्यात आलेला आहे.

 

  • देखभाल व दुरुस्ती

या बाईकच्या देखभाली संदर्भात बोलायचे झाल्यास, पेट्रोल वाहनाप्रमाणे दर ५००० किमी नंतर सर्विसिंग करून घेणे गरजेचे आहे.

 

  • स्पेअर पार्ट उपलब्धता

या बाईकचे स्पेअर पार्ट तुम्हांला बजाजच्या अधिकृत डीलर स्टोअर व अधिकृत सर्विस सेंटर मध्ये सहजपणे उपलब्ध होतील.

 

  • ही बाईक ५ रंगात उपलब्ध 

     १. कॅरिबियन ब्लू

     २. इबोनी ब्लॅक

     ३. सायबर व्हाईट

     ४. रेसिंग रेड

     ५. प्यूटर ग्रे





Comments

Popular posts from this blog

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, महाराष्ट्र राज्य Mukhyamantri Laadki bahin Yojna in Marathi

जेसिका वॉटसन : एक साहस कथा JESSICA WATSON : AN ADVENTURE STORY

नारी शक्ती दूत अँप, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना Mukhyamantri mazi ladki bahin yojna in Marathi