जेसिका वॉटसन : एक साहस कथा JESSICA WATSON : AN ADVENTURE STORY

जेसिका वॉटसन : एक साहस कथा जेसिका वॉटसन : एक साहस कथा JESSICA WATSON : AN ADVENTURE STORY (फोटो सौ.- जेसिका वॉटसन अधिकृत संकेतस्थळ) समुद्राची राणी म्हणजे जेसिका वॉटसन असे बोलले तर अतिशयोक्ती नाही ठरणार , कारण तिची साहस कथाच तितकी मोठी आहे. जेसिका वॉटसन ही ऑस्ट्रेलियन तरुणी केवळ १६ वर्षांची असताना समुद्रात एकटीने आणि न थांबता जगभर प्रवास करणारी सर्वात लहान व्यक्ती ठरली. तिच्या धैर्याने आणि आत्मविश्वासाने तिने संपूर्ण जगाला प्रभावित केले. जेसिका वॉटसनचा जन्म १८ मे १९९३ रोजी ऑस्ट्रेलिया मधील क्वीन्सलँड येथे झाला. जेसिकाच्या मनात लहानपणापासूनच समुद्राबद्दल खूप जास्त आकर्षण होते. त्यामुळे तिने लहान असल्यापासूनच नौकानयनाचे धडे घेण्यास सुरवात केली. तिने समुद्रमार्गे जगभ्रमंती करण्याचे ठरविल्यानंतर नौकानयनाशी निगडित विविध प्रकारचे प्रशिक्षण घेण्यास सुरवात केली. लहानपणापासून ती डिस्लेक्सिया या आजाराशी लढा देत होती. पण या आजाराला तिने कधी स्वतःच्या ध्येयाच्या आड येऊ दिले नाही. तिने जे ध्येय ठरविले होते ते खूप धोकादायक आहे याचीही तिला कल्पना होती , पण त्याला तिने धाडसान...