जेसिका वॉटसन : एक साहस कथा जेसिका वॉटसन : एक साहस कथा JESSICA WATSON : AN ADVENTURE STORY (फोटो सौ.- जेसिका वॉटसन अधिकृत संकेतस्थळ) समुद्राची राणी म्हणजे जेसिका वॉटसन असे बोलले तर अतिशयोक्ती नाही ठरणार , कारण तिची साहस कथाच तितकी मोठी आहे. जेसिका वॉटसन ही ऑस्ट्रेलियन तरुणी केवळ १६ वर्षांची असताना समुद्रात एकटीने आणि न थांबता जगभर प्रवास करणारी सर्वात लहान व्यक्ती ठरली. तिच्या धैर्याने आणि आत्मविश्वासाने तिने संपूर्ण जगाला प्रभावित केले. जेसिका वॉटसनचा जन्म १८ मे १९९३ रोजी ऑस्ट्रेलिया मधील क्वीन्सलँड येथे झाला. जेसिकाच्या मनात लहानपणापासूनच समुद्राबद्दल खूप जास्त आकर्षण होते. त्यामुळे तिने लहान असल्यापासूनच नौकानयनाचे धडे घेण्यास सुरवात केली. तिने समुद्रमार्गे जगभ्रमंती करण्याचे ठरविल्यानंतर नौकानयनाशी निगडित विविध प्रकारचे प्रशिक्षण घेण्यास सुरवात केली. लहानपणापासून ती डिस्लेक्सिया या आजाराशी लढा देत होती. पण या आजाराला तिने कधी स्वतःच्या ध्येयाच्या आड येऊ दिले नाही. तिने जे ध्येय ठरविले होते ते खूप धोकादायक आहे याचीही तिला कल्पना होती , पण त्याला तिने धाडसान...
Mukhyamantri Laadki bahin Yojna in Marathi *मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना* योजनेचे नाव - लाडकी बहीण योजना अर्ज करण्याची अंतिम तारीख - ३१ ऑगस्ट २०२४ अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे - १. आधार कार्ड २. अधिवास प्रमाणपत्र/ जन्म प्रमाणपत्र/शाळा सोडल्याचा दाखला ३. उत्पनाचा दाखला ४. अर्जदाराचे हमीपत्र ५. बँक पासबुक ६. रेशन कार्ड (पिवळे किंवा केशरी) ७. पासपोर्ट साईज फोटो लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक पात्रता - १. लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वर्षे वयोगटातील असणे आवश्यक २. विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता,निराधार महिला तसेच त्या कुटूंबातील केवळ एक अविवाहित महिला ३. लाभार्थी कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखांपेक्षा जास्त नसावे. ४. लाभार्त्याचे बँक खाते असणे आवश्यक अर्ज करण्याची पद्दत - ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने उपलब्ध ऑनलाईन अर्ज करण्याची पद्दत -आपल्या मोबाईल मधील प्ले स्टोअरमध्ये जाऊन नारी शक्ती दूत हे अँप डाउनलोड करून त्यावर घरी बसून आरामात अर्ज ...
एमक्योर फार्मास्युटिकल्स एमक्योर फार्मास्युटिकल्स ही पुण्यातील एक नामांकित औषध निर्माण कंपनी आहे. या कंपनीची स्थापना १९८१ मध्ये झाली. ही कंपनी जगातील ७० पेक्ष्या जास्त देशात काम करते. हि कंपनी देशातील १३ वी सर्वात मोठी फार्मा कंपनी आहे. या कंपनीचे एमडी व सिइओ श्री सतीश मेहता हे आहेत. हि कंपनी व्हिटॅमिन , मिनरल्स आणि नुट्रीएंट्स , डायबेटिस , हृदयरोग , स्त्रीरोग , कॅन्सर , एच आई व्ही या व अश्या अनेक प्रकारच्या रोगावरील औषधे बनवते. सध्या एमक्योर फार्मास्युटिकल्स च्या शेअरची खूप चर्चा होत आहे. एमक्योर फार्मास्युटिकल्सने आपल्या IPO ची घोषणा केली. शेअरची किंमत प्रति शेअर ९६०रु. ते १००८ रु ठरवली होती. हा IPO ३ जुलै २०२४ ला सुरु झाला होता , ५ जुलै २०२४ ला बंद झाला. या शेअर ची १० जुलै २०२४ ला लिस्टिंग झाली आहे. नमिता थापर ज्यांना आपण नेहेमी शार्क टॅंक या शो मध्ये पाहतो , त्या एमक्योर फार्मास्युटिकल्सच्या कार्यकारी संचालक आहेत.
Comments
Post a Comment